HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर युट्यूबर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मंजूर

मुंबई | युट्यूबर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला आज अखेर जेलमधून सुटका झाली आहे. राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन परीक्षेवरून विद्यार्थ्यांना चिंतवणीखोर वक्तव्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घरासमोर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. मुंबई सत्र न्यायालयाने ३० हजाराच्या जमीनावर हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. या मुद्द्यांवरून हिंदुस्थानी भाऊने त्यांच्या सोशल मीडियावर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करणार व्हिडिओ टाकला असून या व्हिडिओमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीच्या घराबाहेर जमा होण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी धारावीमध्ये वर्षा गायकवाडच्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलनने आक्रमक रुप घेतले होते. विद्यार्थ्यांवर नियमंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती.

भाऊवर या कलमातर्गंत गुन्हा नोंदविला

हिंदुस्थान भाऊविरोधात धारावी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी कलम ३५३, ३३२, ४२७, १०९, ११४, १४३, १४५, १४६, १४९, १८८, २६९, २७० भा द वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंग सह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 या कलमा अंतर्गत अटक करण्यात आली होती

हिंदुस्थानी भाऊ नेमके काय म्हणाला

हिंदुस्थानी भाऊने २४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे, तर मग परीक्षा ऑफलाईन का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, अशी विनंती देखील भाऊने सरकारला केली आहे.

 या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने आपल्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या, अशी मागणी त्याने केली आहे. परीक्षा घेऊच नका, असे मी म्हणत नाही. मात्र, कोरोना महामारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अथवा ऑनलाईन घ्याव्या, असे त्याने सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी माझ्या संपर्कात असून अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही तर त्यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद देत राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाचे नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

“मदती ऐवजी नुसतं राजकारण जमतं”, भाजपचा महाविकासआघाडीवर निशाणा

News Desk

तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा… पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा

News Desk