HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, महापौरांकडून स्पष्ट

मुंबई | महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉकला सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. ५ टप्प्यांमध्ये हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यांची वर्गवारी पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या निकषावर ठरवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं असून, मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (५ जून) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण 515 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळं मुंबई ही तिसऱ्या लेवलपर्यंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जाती. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असंही त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षांकडून शब्दांचा झिम्मा – महापौर

विरोधी पक्षाकडून लसीचं ग्लोबल टेंडर आणि इतरही नियोजनाच्या बाबतीच होणारी टीका पाहता या पक्षाकडून शब्दांचा झिम्माच सुरु आहे. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं लक्ष्य काय आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यास आमचं प्राधान्य आहे, ही बाब महापौरांनी ठणकावून सांगितली आहे. टीका करण्यापेक्षा नागरिकांच्या हिताचा विचार विरोधी पक्षानंही करावा असा आग्रही सूर यावेळी त्यांनी आळवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राचा मोठा निर्णय ! CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

News Desk

खुशखबर ! मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकानच सुरु करण्यास परवानगी

News Desk

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk