HW News Marathi
Covid-19

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासुन आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी आशा सेविका,जीम संघटना, रेस्टॉरंट मालक,मंदिर समिती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.त्यानंतर आज मुंबईच्या डबेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. लॉकडानमध्ये रेल्वेसेवा बंद असल्याने डबेवाल्यांना त्रास सहन करावा लागला परंतु आता सुरू झालेली लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचं आहे तेव्हा लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी डबेवाल्यांनी राज ठाकरेंकडे केली . . मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.

दोनचं दिवसांपूर्वी मनसेने मुंबईतील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन केलं.मनसेने केलेल्या या आंदेलनाला डबेवाल्यांनीसुद्धा पाठींबा दिला आहे. लोकल रेेल्वेसाठी मनसेने केलेले आंदोलन हे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी आजराज ठाकरेंची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

News Desk

महाराष्ट्रातही सर्वांनी कोरोनाची लस मोफतच ! ही घोषणा करत मालिकांची भाजपवर टीका

News Desk

फेसबुक, ट्विटरवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?,” सेनेचा टोला

News Desk