HW News Marathi
Covid-19

मुंबईचे नवीन महापालिका आयुक्त चहल आज हाॅटस्पाॅट धारावी व नायर रुग्णालयाला देणार भेट

मुंबई | महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर राज्यातील मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णा आहे. मुंबईतील वाढ रोखण्यास असमर्थ ठरत असल्याच्या कारणामुळे प्रवीण परदेशी यांची बदली केल्याची सुत्रांची माहिती आहे. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची काल (८ मे) बदली केली आहे. परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव इकबाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी चहल हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. चहल हे आज (९ मे) कोरोना हाॅटस्पाॅट बनलेल्या धारावी आणि नायर रुग्णालयाला भेट देणार आहेत.

धारावी येथे दाटीवाटीची वस्ती, एका घरात अनेकांचा वावर, सार्वजनिक स्वच्छतागृह या रचनेमुळे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. चहेल यांनी धारावीचा विशेष अभ्यास असणारा अधिकारी मुंबईच्या आयुक्तपदी आल्यानंतर परिस्थितीत फरक पडू शकतो, असे मानले जात आहे. इक्बाल सिंग चहल हे १९८९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. चहल हे नियमित पणे मुंबई मॅराथॉनमध्ये सहभागी होतात आणि ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करतात. यापूर्वी इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची कामगिरी चांगली मानली जाते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचे ४७ रूग्ण , मुंबई आणि उल्हासनरमध्ये महिलेला कोरोनाची लागण !

Arati More

मोदींच्या लेह भेटीसाठी खोटे रुग्णालय उभारले?

News Desk

 भारत जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- पंतप्रधान

News Desk