HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

मुंबई विद्यापीठावर कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची आली पाळी!

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये गोंधळ सुरू आहे. एकतर कोरोना संकटामुळे परीक्षा होते नव्हत्या. मात्र, आता होत आहेत तर अडचणी येत आहेत. काल (६ ऑक्टोबर) तांत्रिक गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. या गोंधळामुळे पेपर पुढे ढकलण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्की ओढवली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला आहे.

लागोपाठ दुसऱ्या दिवशी टीवायबीए, टीवायबीकॉमसह आयडॉलच्या म्हणजे दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाला. लॉग इन होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. हेल्पलाईनवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर कालचे पेपर रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर आली आहे.

Related posts

शिवभोजन थाळीच्या शर्यतीत आता दीनदयाळ थाळी

rasika shinde

“सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली

Gauri Tilekar

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी होणार

News Desk