HW News Marathi
Covid-19

‘बीएमसी’च्या कोरोना वॉरियर्सच्या वारसांना ५० लाखांची मदत

मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाई लढताना कोरोना वॉरियर्सचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केली आहे. यानुसार, १ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी देशामधील मुंबई महापालिका पहिली ठरली आहे. यात महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या निधीमधूनच कर्मचाऱ्यांना अर्थ सहाय्य केले जाणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासकीय उपक्रम यांना दिनांक २९ मे रोजी दिले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

News Desk

निलेश लंकेंचा थेट कोविड सेंटरमध्ये मुक्काम! रुग्णसेवेचा अहोरात्र सपाटा सुरुच

News Desk

मुंबईत आज आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

News Desk