HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत एका महिलेचा खून; अवघ्या ४ तासांत आरोपी ताब्यात

बीड | बीडमधील परळीत कौटुंबिक वादातून किंवा पैशाच्या वादातून अनेकदा टोकाचे संघर्ष आपण पाहत असतो. मात्र, हा संघर्ष ज्यावेळी रागात बदलतो त्यावळे हत्येसारखे गुन्हे जन्म घेतात. असाच एक प्रकर बीडमधील परळीत घडलाय. एका महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आलीय. या महिलेच्या हत्येने परळीत सध्या दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. परळी शहराजवळील आयेशा नगर येथे एका ५० वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. यात या महिलेचा जीव तर गेलाच मात्र या हत्येवेळी काही जण जखमीही झाले आहेत. यात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या हत्येने परळीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. या हत्येने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण केले आहे. यात आता लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.

अवघ्या ४ तासांत आरोपी ताब्यात

या हल्ल्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाली आहे. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याची माहिती समोर आली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. मात्र या हत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही, या हत्येचे कारण काय आहे, याचा शोध सध्या परळी पोलिसांकडून सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तपास वेगवान केला

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता तपासाला अधिक वेग आला आहे. पोलिसांकडून या हत्येबाबत अध्याप कोणतीही स्पष्ट मोहिती देण्यात आली नाही, त्यामुळे या हत्येमागील स्पष्ट कारण समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून आणखा काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पोलीस तपासात आणखी काही महत्वाच्या बाबती समोर येण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हत्येचे कारण तपासानंतरच समोर येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला | एकनाथ शिंदे

News Desk

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

News Desk

गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna