HW News Marathi
महाराष्ट्र

‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा – मुरलीधर मोहोळ

पुणे | शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये सोई-सुविधांची कमतरता असून पुणेकरांच्या मोठ्या तक्रारी येत आहेत. शिवाय केवळ ३३० बेड्स उपलब्ध असतानाही रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

जम्बो रुग्णालयात रुग्ण दाखल करायला सुरुवात केल्यापासून मोठ्या तक्रारी येत आहेत. शिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यूही कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने झाला होता. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी लक्ष वेधून ‘जम्बो’च्या समस्या मांडल्या.

जम्बोबाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसोबत मुद्दे मांडताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असनातानाही गंभीर रुग्णांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या टक्केवारी खाली आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. टेस्टिंगसंदर्भात खासगी लॅबमध्ये RT-PCR ची संख्या जास्त असली तरी सरकारी लॅबमध्ये कमी आहे. तातडीने वाढवण्यात यावी. शिवाय खासगी लॅबबाबत अजूनही म्हणावा तसा समन्वय दिसत नाही, तोही आवश्यक आहे.’

‘शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती अजूनही हाताबाहेर गेली नसून मात्र आताच्या परिस्थितीत सुविधा देणे आवश्यक आहे. शिवाय पुणे महापालिकेला आर्थिक मदत राज्य सरकारने करावी, अशीही मागणी केल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”,संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

News Desk

राज्यात १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता !

News Desk

अस्वस्थ ‘कॉर्पोरेट’ लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचललाय !

News Desk