HW News Marathi
महाराष्ट्र

लोकाभिमुख पोलिसिंगचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. के. वेंकटेशम

पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त वेंकटेशम यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची बदली झाल्यानं ते आता पुणेकरांच्या सेवेत नसतील. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत लोकाभिमुख पोलिसिंगचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवत कार्यपद्धती अवलंबताना पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तमप्रकारे त्यांनी सांभाळली.

कोरोनाच्या काळात तर पुणे पोलिसांची कामगिरी अद्वितीय आहे. या टीमचं नेतृत्व करणारे डॉ. के. वेंकटेशम खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेचे केलेलं नियोजन, लॉकडाऊनची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी लक्षात घेऊन अनेक गरजूंना पुणे पोलिसांनी मोठा आधार दिला.

गणेशोत्सव काळात ‘घरच्या बाप्पाचं, घरीच विसर्जन’ आणि ‘मंडळांच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन’ या आपण केलेल्या दोन्ही आवहानांना डॉ. के. वेंकटेशम यांनी मनापासून साथ देत सक्रीय सहभाग नोंदवला.

तीन वर्षांच्या कालावधीत पोलीसांच्या कार्यपद्धतीत कल्पकता आणताना त्यांनी सुरू केलेले ‘भरोसा सेल’ ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शोषितांसाठी आधार ठरले.डॉ. के. वेंकटेशम यांना अविरत सेवेबद्दल पुणेकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना! नितेश राणेंनी डिवचलं

News Desk

“भारताची गौरवशाली विज्ञान पंरपरा पुढे नेऊ या”, ॲडा योनाथ यांची वैज्ञानिकांना साद

Aprna

ओबीसी जनगणनेवर सत्ताधारी-विरोधकांचे एकमत, विधानसभेत कोण काय म्हणाले

swarit