HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफ सोडणार अहमदनगरचं पालकमंत्री पद?

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ हे आपलं पालकमंत्रीपद सोडणार असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. “आपण केवळ २ वर्षांसाठी पालकमंत्री राहू”, असं मुश्रीफ यांनी आधीच पक्षाला सांगितलं होतं असं म्हटलं जात असून आता ते आपलं हे पद सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या हे एकीकडे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर घोटाळ्यांचे आरोप करत असल्यानेच दुसरीकडे मुश्रीफ यांनी आपलं पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे का? असंही म्हटलं जात आहे. किरीट सोमय्यांकडून मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्याकडे याबाबत २७०० पानांचा पुरावा असून तो आपण आयटीला दिला असल्याचं देखील सोमय्या यांनी सांगितलं आहे.

सोमय्यांनी काय आरोप केले?

ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे २७०० पानांचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे उत्तर

News Desk

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली मदत

News Desk

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

News Desk