HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक!

बीड। बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात धगफुटीने अतोनात नुकसान केले आहे तसेच केज मतदारसंघात अतिवृष्टी झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून सरकारला जागे करण्यासाठी भाजपा आ.नमिता मुंदडा यांनी आज अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे गेल्या 15 दिवसात ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बहुतांश भागात पुरसदृश परिस्थिती आहे. शेतीचे 100% नुकसान झाले आहे. घरे, रस्ते, पूल यांचेही प्रचंड नुकसान झाले.या परिस्थितीत बाधित शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांना दिलासा व आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी केज विधानसभेच्या भाजपाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग अंदोलन केले.

धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका

ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याचं शेती पिकांसह शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय.मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावं. नुकसानाची भीषण दृष्य पाहावीत. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहिती नाही. मात्र, लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात अखेर गुन्हा दाखल

News Desk

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालावरुन अमृता फडणवीसांचे सुचक ट्विट

News Desk

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद! – अजित पवार

Aprna