HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आले !

मुंबई | “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेले असून मी आज सुखरूप घरी जात आहे,” असे ट्वीट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड केले आहे. आव्हाडांवर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आव्हाड यांनी रुग्णालातील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद, ट्वीट करत आभार मानले आहे.

आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.” “माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.”

“अपने कदमों के काबिलियत पर विश्वास करता हूं , कितनी बार तूटा लेकीन अपनो के लिये जीता हूं ,चलता रहूंगा पथपर चलने मैं माहीर बन जाऊंगा या तो मंजिल मिल जायेगी या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.” ही कविता आव्हाड यांनी ट्वीट करत एक कविता पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा कोरोनाची लागण

आव्हाड यांचा कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी स्वत: ला क्वॉरंटाईनही केले होते. सुरुवातीला त्यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर अचानक ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि तेव्हा आव्हाड यांची तब्यात बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर दुसऱ्यांदा आव्हाडांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आव्हाड यांच्यावर पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Related posts

दिवस मावळल्यानंतरही लाईट लावून फडणवीसांचा पाहणी दौरा सुरूच

News Desk

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

नवी मुंबईतील शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

News Desk