HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचे योग्य निदान करणारा पहिला किट पुण्यात मायलॅब डिस्कवरी सॉल्यूशनने केला विकसित

पुणे | कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उपचारासाठी रिलायन्सने महापालिकेसोबत दोन आठवड्यांच्या अत्यंत कमी कालावधीत १०० बेडची क्षमता असलेले भारतातील पहिल्या कोरोना समर्पित केंद्रांची उभारणी केली. आता त्यानंतर कोरोनाच्या बाबतीत अचूक निदान करणारा देशातील पहिला किट विकसित करण्यात आला आहे. या कीटला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (D.C.G.I) काल (२३ मार्च) मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कोरोना निदानासाठी देशात दररोज दहा हजार जणांची चाचणी होणे शक्य आहे. हा महत्त्वाचा किट मायलॅब डिस्कवरी सॉल्यूशन या पुण्यातील कंपनीने विकसित केला आहे.

कोरोनाची लागण झाली आहे की नाही या निदानासाठी किट असणे अत्यावश्यक आहे. हे किट आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील ५२ प्रयोगशाळांना देण्यात येते. मात्र नुकतेच हे किट भारतीय कंपनीने पुण्यामध्ये विकसित केले आहे. त्याच्या गुणवत्तेची आणि अचूक रोगनिदानाची काटेकोर तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली आहे. दरम्यान, गेले अनेक दिवस हे किट केंद्र सरकार आयात करुन प्रयोगशाळांना देत होते. मात्र आता हे किट पुण्यातील एका कंपनीने विकसित केल्याने महाराष्ट्रात आणि आपल्या देशात कोरोनाशी सामना करणे थोडे का होईना पण सोपे होईल. कोरोनाचे निदान करणारे हे देशातील पहिले किट असल्याचा दावा केला जात आहे. हे किट विकसित करण्यासाठी ३ ते ४ वर्षाचा कालावधी लागतो.

या किटच्या उत्पादनासाठीची लागणारी परवानगी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. त्यानुसार रोज एका शिफ्टमध्ये १० हजार किट उत्पादीत करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत ही उत्पादन क्षमता वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, या किटद्वारे रुग्णाचे अचूक निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र ते न झाल्यास मोठा सामाजिक फटका बसू शकतो. त्यामुळे याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. आता तरी लवकरात कोरोनाचे निदान होऊन तो बरा होण्यासाठी या किटच वापर नक्कीच होईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेजस ठाकरेंनी लावला खेकड्यांच्या ११ नवीन प्रजातींचा शोध

News Desk

‘तर मास्तराच्या मुलाने हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली त्यांची चौकशी का होत नाही’-एकनाथ खडसे

News Desk

माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग – गिरीश महाजन

News Desk