HW News Marathi
Covid-19

भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

भाईंदर | मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेते यांचे आज (९ जून) सकाळी कोरोनामुळे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याचे समोर आले आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील काशी नगर परिसरात शिवसेना नगरसेवक निवडून आले होते. २ आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पत्नी आणि आईलादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा गणेशोत्सवासाठी मंडळातील मुर्ती ४ फुट तर घरातील बाप्पा २ फुटांचा!

News Desk

कोरोनामुळे रविवार असुनही मंत्र्यांच्या बैठका ,शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Arati More

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर ४ लाखांच्या खाली!

News Desk