HW News Marathi
Covid-19

नागपूर महापालिका सभेत गदारोळ, वैयक्तिक टीकेमुळे तुकाराम मुंढे सभागृहातून पडले बाहेर

नागपूर | नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (२० जून) जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी सभेतील वातावरण इतके पेटले कि नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे थेट सभागृहातून निघून गेले. या सभेत भाजपच्या नेत्यांकडून तुकाराम मुंढेंवर वैयक्तिक टीका झाली, तसेच काही बोचरी विधाने करण्यात आली. ज्यामुळे चिडून तुकाराम मुंढेंनी सभेतून काढता पाय घेतला. “संत तुकारामांच्या नावावरून तुमचे नाव आहे. त्याला कलंक लावू नका.तुम्ही सभागृहच काय, नागपूरची सोडून जा”, अशी वक्तव्ये भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे काटेकोर पालन करत सभा घेण्यास राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेला परवानगी दिली आहे. मात्र, त्यापूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभा घेण्यास नकार दिला होता. यावरून नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी असे दोन गट पडले. हा वाद मोठा झाला. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आज सर्वसाधारण सभा देखील पार पडली. मात्र, भाजप नगरसेवकांच्या वागणुकीमुळे तुकाराम मुंढे थेट सभागृहातून निघून गेले.

सभागृहात नेमका काय प्रकार घडला ?

नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंढे बोलत असताना भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. त्यावेळी, “जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी सभेतून बाहेर पडेन”, असे तुकाराम मुंढेंनी सांगितले. यावेळी तुकाराम मुंढेंवर अत्यंत वैयक्तिक पातळीवर टीका देखील झाली. “संत तुकारामांच्या नावावरून तुमचे नाव आहे. त्याला कलंक लावू नका.तुम्ही सभागृहच काय, नागपूरची सोडून जा”, अशी विधाने भाजप नगरसेवकांनी केली. त्यानंतर, चिडलेल्या तुकाराम मुंढे थेट सभागृहातून निघून गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षनेत्यांनी एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल | सामना

News Desk

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk

काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ रुग्णवाहिका व ६१ लाख मास्कचे वाटप करणार !

News Desk