HW News Marathi
महाराष्ट्र

“माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला,” पोलिस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल(२४ ऑगस्ट) कोर्टाने जमीन दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र कालच त्यांना जमीनही मिळाली आहे. नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं चॅलेंज नाही. माझंही थोडं ज्ञान आहे त्यानुसारच मी आदेश काढला, असं मत दीपककुमार यांनी व्यक्त केलं आहे.

माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला

“माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सुज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. मात्र काल राणे साहेबांना जामीन मंजूर झाला, साहेबांनाी लिहून दिलं आहे अशी पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून अटक करण्याचा अर्थ नाही, त्यामुळे मंत्रिमहोदयांना नोटीस देऊन पूर्तता केली,” असं दीपक कुमार म्हणले आहेत.

आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही

“नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त 2 सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ते स्वीकारलं आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे,” असंही पोलीस आयुक्तांनी नमूद केलं आहे.

ते कधीही येऊ शकतात. त्याबाबत त्यांना मूभा आहे

“ते कधीही येऊ शकतात. त्याबाबत त्यांना मूभा आहे. सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. ते सहकार्य करत आहेत, आदर करतो, स्वागत करतो. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या संदर्भात जे कोणी व्यक्ती आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. मंत्रिमहोदयांना 2 सप्टेंबरची तारीख दिली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. साहेब तुम्ही या आणि तुमचा जबाब नोंदवा,” असं ते पुढे म्हणाले आहेत.

“नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त 2 सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ते स्वीकारलं आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे,” असंही पोलीस आयुक्तांनी नमूद केलं आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर शेलारांचा माफीनामा

swarit

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग, पवारांच्या जवळचे मंत्री भेटीला

News Desk