धुळे । पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहे.
नवी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.
मात्र, धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धात सोडून आज (२४ जून) सायंकाळी नाना पटोले मुंबईला जाणार आहे. आज संध्याकाळीच मुंबईहून पुढे दिल्लीला रवाना होणार आहे. पावसाळी अधिवेशन आता जवळ असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.
*महत्वाची बैठक*
नवी दिल्लीत काँग्रेसची उद्या (२५जून) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत जाण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. पावसाळी अधिवेशन येऊ घातले असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.
नाना पटोले हे वारंवार स्वबळाची भाषा करतात आणि याच स्वबळाच्या भाषेवरून आता काँग्रेसच्याच काही नेत्यांनी नाराजी दर्शवली अजून निवडणुकांना बराच वेळ आहे म्हणून आत्ताच स्वबळाची भाषा करणे योग्य नाही अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील नाराज आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.