HW News Marathi
देश / विदेश

नाना पटोलेंनी दिली राहुल गांधींना भेट, केली मोठी घोषणा!

 

नवी दिल्ली | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट स्वबळाची भाषा केल्याने काँग्रेस निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी सोबत राहणार नाही

नाना पटोले ह्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते आता सध्या दिल्लीत असून राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत असल्याचे समजत आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

सध्या मोदी जनतेची हेगिरी करत आहेत

‘पक्ष माझ्यावर लक्ष ठेऊन आहे’ हे वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. त्यावर त्यांनी भाष्य केलं कि, ‘सध्या मोदी सर्व जनतेची हेरगिरी करत आहेत . लोकांच्या प्रायव्हसीला धोका पोसवण्याचं काम मोदी आणि भाजप करत आहे. काँग्रेस हेरगिरी करण्याचं काम करत नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

फेरबदलाच्या चर्चांना पूर्णविराम

मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सध्या चर्चेत आहे. राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल आज लोकसभेत

News Desk

#Coronavirus : आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमला ममता बॅनर्जींचा विरोध

News Desk

काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा फक्त दावा करतात !

News Desk