HW News Marathi
देश / विदेश

‘भाजप चले जाव म्हणायची वेळ आली’, नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

मुंबई | ९ ऑगस्ट, क्रांती दिवसाच्या निमित्ताने काँग्रेसने क्रांती मैदानात कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात नाना पटोले बोलत होते. येवेळी त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. या देशाला 2014पासूनच ग्रहण लागलं आहे. ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्यही धोक्यात आलं आहे, असा हल्ला नाना पटोले यांनी भाजवर चढवला आहे.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्ष संघर्ष करावा लागला

स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक आज सत्तेत असून मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या करत आहेत. ही लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन पटोले यांनी केलं आहे.

मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षात ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे. शेतकरी, तरुण, व्यापारी वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आले आणि संविधान व्यवस्था बदलण्याचे काम केले जात आहे. देश बलशाही बनवण्यासाठी वाटचाल सुरु असताना ते स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

‘चले जाव’

महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. परंतु, आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. आता आपल्याला देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देश व लोकशाही व्यवस्था वाचवायची गरज आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसौनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पहायला मिळत आहे. देशासाठी त्यावेळी असलेली मूल्ये व तत्वे यांची तुलना करता आज त्या मूल्ल्यांना, तत्वांना तिलांजली दिली जात आहे. लोकशाही धोक्यात आहे, आज ज्या पद्धतीने कारभार सुरु आहे तो काय कामाचा, आता खरी लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान आपल्यापुढे येऊन ठेपले आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

‘भाजपा चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली

नाना पटोले हे नेहमीच भाजप पक्षावर निशाणा साधून असतात. आताही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याच मैदानातून जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा दिला होता. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजपा चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

का पडला किंगखान ममता दिदींच्या पाया

News Desk

देशात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात – नरेंद्र

News Desk

Hyundai कंपनीच्या ‘त्या’ ट्वीटवरून वाद; कंपनीनं बिनशर्त माफी मागावी, शिवसेनेची मागणी

News Desk