HW News Marathi
महाराष्ट्र

“आपल्याला संपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना…”, नाना पटोलेंचा सूचक इशारा

ठाणे | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक इशाराच दिला आहे. ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना पटोले यांनी हा इशारा दिला आहे. ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कारण्यात आलेल्या कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते. 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकणार होते. पण यापैकी काहीही झालं नाही. नोटाबंदी केल्यानंतर लोक रांगेत रांगा लावून मेले. पण खात्यात 15 लाख आलेच नाहीत. अडचणींचा सामना सामान्य जनतेने केला. भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

केंद्रावर पटोलेंचा हल्लाबोल

जीएसटी आल्यापासून हे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरले. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा झाला नाही. कोविड काळात कायदा लावला. एकीकडे लस नाही. लस आणि ऑक्सिजन आधी मोफत होते. आता केंद्रामुळे तेही विकत घेण्याची वेळ आली आहे. ही वेळ आणण्याचं पाप मोदी सरकारने केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

मदत साहित्याचं वाटप

बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाणार आहे. तसेच यावेळी तृतीय पंथीयांना रेशन किटचं वाटप करण्यात आलं. तसेच विकलांगांना व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी किन्नर समाजाला मदत केली जात आहे. हाच मदतीचा हात विकलांगांनाही देण्यात आला आहे. केंद्र सरकार आपल्याला लस देत नाही. पण या ठिकाणी आपण लस खरेदी करून लोकांना मोफत देत आहोत. हा चांगला उपक्रम आहे. अनेक श्रीमंत लोक आपला वाढदिवस साजरा करतात. मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस होतो. पण काँग्रेस कार्यकर्ते वाढदिवसाच्या दिवशी लोकांना मदत करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार घोषीत 

News Desk

जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन

News Desk

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठी उमेदवारांची निवड येत्या आठवड्यात जाहीर होणार। नितीन राऊत

News Desk