HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीची आघाडी

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने नांदेड जिल्ह्यातही आपले वर्चस्व स्थापित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा दणदणीत विजय मिळवला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपने एकाही जागी आपले खाते उगडले नाही पण एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाला. या घवघवीत यशाने पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातही महाविकास आघाडीने आपली आघाडी सिद्ध केली आहे.

नांदेडमधील या पोटनिवडणुकीत नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (ड) मध्ये अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार १ हजार ८६६ मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र.२ (अ) मध्ये कविता नारायण बोलमवाड २२९ मतांनी, वॉर्ड क्र. ४ (अ) मधून सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड ४६६ मतांनी, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. १३ मधून अजगरी बेगम अ. रहेमान ३४१ मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. १ मध्ये बोईनवाड हणमंत आनंदराव २०७ मतांनी विजयी झाले असून, बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. ५ (अ) मध्ये लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना केवळ ७० मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसनंतर राष्ट्रवादी निर्णय देणार | नवाब मलिक

News Desk

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

News Desk

आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर…! – जयंत पाटील

Aprna