HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात ना ॲाक्सिजन,ना बेडची कमी…जिल्हाधिकाऱ्यांच होतयं कौतुक

नंदूरबार | सध्या कोरोनाच्याच चिंता वाढवणाऱ्या बातम्या वाचण्यात येत आहेत. औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा या सगळ्या गोष्टींची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. देशात ही कोरोनाची दुसरी लाट आली असताना सगळीकडे वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्यानं कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे राज्यातील एका जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती आहे. नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रयत्नाने आणि त्यांनी केलेल्या विचाराने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे.

राज्यात अनेक जिल्हे हे आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्यातील एक जिल्हा म्हणजे नंदुरबार.

आदिवासीबहुल अशी नंदूरबार जिल्ह्याची ओळख. गेल्या वर्षीपासून नंदूरबारनं कोरोनाशी लढण्यास सुरुवात केली. त्यावेळी जिल्ह्यात २० बेड्स होते. मात्र, आताच्या घडीला जिल्ह्यातल्या रुग्णालयांत एकूण १ हजार २८९ बेड्स आहेत. तर कोविड केअर सेंटर्समध्ये १ हजार ११७ बेड्स आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयांत ५ हजार ६२० बेड्स उपलब्ध आहेत. शाळा, वसतिगृहं, सोसायट्या, मंदिरांनादेखील बेड्स पाठवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर ७ हजारहून अधिक आयसोलेशन बेड्स आणि १ हजार ३०० आयसीयू बेड्सदेखील जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

सुरुवातीला ऑक्सिजनसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून असलेला नंदूरबार जिल्हा आज ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. संपूर्ण राज्यात, देशात ऑक्सिजनची कमतरता आणि तुटवडा जाणवत असताना जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांच्या दूरदृष्टीमुळे नंदूरबारवर तशी वेळ आलेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, बायकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझूमदार शॉ, रेल्वे मंत्री पियूष गोयल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे अशा दिग्गजांनी डॉ. भारूड यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात नंदूरबार मॉडेल राबवण्याची घोषणा राजेश टोपेंनी केली आहे.

कोण आहेत डॉ भारुड?

डॉ भारुड हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी केईएम रुग्णालयातून एमबीबीएसचं शिक्षण पुर्ण केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असेल याचा अंदाज भारूड यांना होताच. त्यामुळे डिसेंबरपासूनच त्यांनी यासाठी जिल्ह्यातली यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली होती. नंदूरबारमध्ये गेल्या वर्षी दिवसाला सरासरी १९० कोरोना रुग्णांची नोंद होत होती. आता हाच आकडा १२०० पर्यंत गेला आहे. भारूड यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीनं वाढून १५०० पर्यंत गेली आहे.

जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून डॉ. भारूड यांनी जिल्ह्यात ३ ऑक्सिजन प्लांट सुरू केले आहेत. इथे दर मिनिटाला ३ हजार लीटर ऑक्सिजन तयार होत आहे. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लिक्विड टँक उभारण्याचं कामदेखील एकीकडे सुरु आहेच. कोरोना रुग्णांसाठी गेल्या ३ महिन्यांत २७ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. डॉ. भारूड यांनी दाखवलेल्या या दूरदृष्टीचं आणि केलेल्या उत्तम नियोजनाचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

News Desk

मोदींच्या थाळ्या पिटण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला मात्र विरोध !सामनातून रोखठोक ताशेरे …

News Desk

अनेक शाळा फी वाढीच्या प्रयत्नात, सरकारने तातडीने लक्ष द्यावे !

News Desk