HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, भाजप खासदाराचा आरोप

नंदूरबार | राज्यात रुग्ण संख्या वाढ एकीकडे असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार यावरुन जोरदार राजकारण, आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशात आता नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन्सची गरज आहे. असं असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिवीरचा साठा बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप गावित यांनी केला आहे.

काय केला आहे आरोप?

“नंदुरबार जिल्हा आणि मतदारसंघात गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, ताई आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय़ घेतला नाही.

शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त ५०० इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचं कळालं. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केल्याचा गंभीर आरोप हीना गावित यांनी केला आहे.

Related posts

#Lockdown 2: भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , पंतप्रधानांची मोठी घोषणा

News Desk

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

News Desk

जाणून घ्या… कुठे होणार महाराष्ट्रातील ४८ जागांची मतमोजणी

News Desk