HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ!

मुंबई : नागरिकत्व कायद्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध मांडला होता त्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ट्विट केले होते. “आदित्य यांनी भाजपला शिकवायची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेली लोकं आहेत. आदित्य ठाकरेंनी कायदा जाणून घेण्याआधी आपली मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडावी”,अशा शब्दांत त्यांच्या ट्विटरवरील नागरिकत्व दुरुस्त कायद्याच्या ट्विटला प्रत्यूत्तर दिले आहे.

मनसे आणि भाजपाच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी या विषयावर बोलणे टाळले तसेच “ही युती होणार की नाही यावर त्या-त्या पक्षाचे पक्षप्रमुख बोलतील” असं उत्तर त्यांनी दिले. याशिवाय सध्याच्या सरकारला आम्ही कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असा विश्वासही राणेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना व्यक्त केला.

नारायण राणे यांनी राज्य सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केले असता “राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र कर्जमाफीच्या जीआरमध्ये अंमलबजावणीच्या तारेखचा उल्लेख नाही. त्यामुळे कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येणार नाही”, असंही नारायण राणे म्हणाले.

“मी कोणावर नाराज नाही. मला या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकत नाही कारण या सरकारला सिरीयस बेस नाही. या सरकारला राज्याचे प्रशासन आणि विकास कसा करायचा ते माहित नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? या सरकारवर कोण नाराज आहे ते तुम्ही शोधा”, असे नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेने भाजपसोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत राणेंना यांना प्रश्न विचारला असता, “भाजप कोणाकडे गेली नव्हती, शिवसेना स्वत:हून आली होती. केंद्रात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपला कुणाचीही फिकीर नाही. खरंतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे 54 पैकी 35 आमदार नाराज आहेत”, असं नारायण राणे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivjayanti 2022: शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे !

News Desk

जाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त

News Desk