HW News Marathi
देश / विदेश

“दादरा नगर हवेलीतील खासदार भाजपात येईल”- नारायण राणे

मुंबई | भाजपा नेते आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. कलाबेन डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया साधली.

तरी देखील आम्हीच जिंकल्याचा शिवसेनेकडून डंका सुरू आहे.

मात्र आता यावरून राजकारण सरू झाले आहे. दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे, आता दिल्ली दूर नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. राऊतांनी पहिले आपले खासदार सांभाळावेत, दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जाग्यावर राहाणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीमधून अपक्ष उमेदवार विजयी झाला. तरी देखील आम्हीच जिंकल्याचा शिवसेनेकडून डंका सुरू आहे.

डेलकर यांची निशाणी धनुष्यबान नसून, बॅट घेतलेला फलंदाज

या पोटनिवडणुकीत डेलकर यांची निशाणी धनुष्यबान नसून, बॅट घेतलेला फलंदाज होता. तरी देखील तेच जिंकल्याच्या अविर्भावात शिवसेना उड्या मारत आहे. शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवयच आहे. संजय राऊत यांनी लिहिले की, शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर भगवा फटकवण्यात यश आले आहे, आता दिल्ली दूर नाही. मात्र मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जाग्यावर राहाणार नाही. राऊत यांना लिहिताना भान राहात नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मजुरांच्या प्रश्नांबाबत केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk

पाकिस्तानचे दहशतवाद्यांवरील कारवाईचे सर्व दावे खोटे !

News Desk

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्करातील मेजर आणि जवान जखमी

News Desk