HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे राज्यसभेवर तर मुले आमदार?

मुंबई- ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कॉँग्रेसला रामराम केला आहे. ते आता भाजपमध्ये दाखल होणार असून त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपमध्ये त्यांना नेमके कोणत्या पदावर घ्यायाचे याबाबत सध्या वरिष्ठ पातळवीर खल सुरू आहे. राज्य सरकारमध्ये त्यांचा समावेश केल्यास त्यांना क्रमांक दोनचे मंत्रिपद द्यावे लागेल. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण होण्याची भीती आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेचाही तिळपापड होण्याची शक्यता आहे. एकूणच राणे यांच्यामुळे राज्यातील तीन प्रमुख ( कॉँग्रेस, भाजप, शिवसेना) पक्षात खळबळ उडाली आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांचा दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा करावी लागत आहे पक्षाचे प्रमुख अमित शहा चर्चा करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. त्यांनी संघातील काही जाणकारांचा सल्ला घेतला. राणे यांना पक्षात घेतल्यानंतर पक्षाला वजन प्राप्त होण्याऐवजी दुफळी निर्माण होण्याची अधिक भीती आहे. पक्षात घेतल्यानंतर दोन वर्ष त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. दुसरीकडे ते मंत्रिमंडळात दाखल झाल्यास शिवसेना धिंगाणा घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत ठेवण्याची मोदी यांची इच्छा आहे. तर राणे यांनाही नाराज करण्याची मोदींची इच्छा नाही. त्यामुळे राणे यांना राज्यसभेवर घेण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना आगामी निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीत उभे केले जाणार असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप व राणे यांच्यावर सोपवली जाणार आहे. एकूणच राणेसह त्यांच्या दोन पुत्रांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या घडामोडीतून सुरू आहे. असे झाल्यास शिवसेनेचा आवाज थंड पडेल. कारण राणे शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत. त्यामुळे शिवसेना सत्तेचा उपभोग घेऊ शकते. राणेंना नाराज न करता शिवसेनेला गोंजारण्याची दुहेरी खेळी भाजप सध्यातरी खेळत असल्याचे दिसून येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग”, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान!

News Desk

केजरीवाल समोर दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांकडून धक्काबुक्की

swarit

नारायण राणेंना आता केंद्राकडून थेट Y दर्जाची सुरक्षा

News Desk