HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार – नारायण राणे

मुंबई | बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्याने आणि त्यांच्या इतर समस्या सोडवल्यामुळे भाजपला बिहारमध्ये विजय मिळाला, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा !” मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Jui Jadhav

“हे म्हणजे मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं असं झालं…”,पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा

News Desk

उदयनराजेंच्या भीक मांगो आंदोलनावर शशिकांत शिंदे म्हणतात…

News Desk