HW News Marathi
महाराष्ट्र

बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही – नारायण राणे

सिंधुदुर्ग | “देवेंद्रजी तुमच्या मनातलं लवकर साध्य होवो. मंत्रालय ओसाड आहे, घरी राहून काम सुरु आहे. बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही”, असा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले.

“देवेंद्र फडणवीस वयाने लहान असले तरी त्यांचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. मी सांगितलेलं कुठलंही काम त्यांनी केलं नाही असं होत नाही. ते नेहमीच सहकार्य करतात”, असे नारायण राणे यावेळी म्हणाले. “ही लॅब उभी राहावी म्हणून भाजपच्या पाच आमदारांनी प्रत्येकी २० लाख रुपये दिले. पाचही जणांचे मी ऋण व्यक्त करतो. दीड तासात ९६ टेस्ट ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती कोकणात होत आहे”, असे समाधान देखील नारायण राणे यांनी व्यक्त केले.

याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. “महाराष्ट्रात आपण कोरोनाशी न लढता संख्येशी लढत होतो. त्यामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

“ही प्रयोगशाळा बघून मला समाधान वाटले. महाराष्ट्रातील आधुनिक लॅबपैकी ही एक लॅब आहे. इथे दीड तासात ९६ टेस्ट होतात. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी ४२ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली – अशोक चव्हाण

News Desk

पंकजा मुंडेंना ऑफर फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात, संजय राऊतांचा खुलासा

News Desk

फडणवीसांची उंची मोदी आणि सह्याद्रीपेक्षा जास्त म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत,राऊतांची टोलेबाजी

News Desk