HW News Marathi
देश / विदेश

हॅट्रीक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये !

मुंबई | “नारायण राणे यांना जर आपली हॅट्रीक चुकवायची असेल तर त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवू नये”, असा सल्ला शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना एक सल्ला दिला आहे. “गेल्या विधानसभेला कुडाळमधून, तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातून नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता जर त्यांना आपली हॅट्रीक टाळायची असेल तर त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवू नये”, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

नारायण राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढणार असल्याची माहिती काहीच दिवसांपूर्वी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिली होती. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर ते पुन्हा राज्यात येणार का ? याबाबतची चर्चा रंगली होती. मात्र, नारायण राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आगामी विधानसभा लढवणार असल्याची घोषणा नितेश राणे यांनी केली. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला आहे.

“शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा जनसंपर्क चांगला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. यंदाही ते निवडून येतील अशी खात्री आहे”, असेही दीपक केसरकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राज्यसभेत सादर होणार ‘तीन तलाक’ विधेयक

swarit

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार

News Desk

#CoronaVirus | कोरोनामुळे युरोपमध्ये राजघराण्यातील पहिला मृत्यू

News Desk