HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंचा कोकणात डंका,’या’ निवडणुकीत महाविकासआघाडीला दिला धक्का!

सिंधुदुर्ग | शिवसेनेच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात नारायण राणेंनी शिवसेना तसेच महाविकासआघाडीला धक्का दिला आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली.या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार संजना सावंत यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले आणि जिल्हा परिषदेवर बाजी मारली आहे.

नितेश राणेंचे ट्विट

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की ,राणेंचा बालेकिल्ला अभेद्य…सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा फडकला भाजपचा झेंडा.जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या संजना सावंत यांची निवड.फोडाफोडीचे विरोधकांचे प्रयत्न धुळीस.

राणेंनी निवडणुकीत कशी बाजी मारली ?

गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबीय हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत आरोप करताना दिसत आहेत.त्यानतंर महाविकासआघाडीला थेट निवडणुकीत चितपट केल्याने राणेंचा आत्मविश्वास बळावला आहे. नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. आताही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या मदतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.मात्र अखेर आज भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे.

दरम्यान, आज भाजपाच्या संजना सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ अशा ११ मतांनी परवान केला .जिल्हा परिषदेमध्ये आज सदस्यांकडून हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाल्याने जिल्ह्यातील राजकारणावर नारायण राणेंचे असलेले वर्चस्व निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळे वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला

swarit

सचिन वाझेला दुसरं समन्स जारी, अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची करणार चौकशी

News Desk

‘प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू’!

News Desk