HW News Marathi
महाराष्ट्र

दाभोळकर हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना काल (२५ मे) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला पुणे सत्र न्यायालयाने १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.

दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती.संजीव पुनाळेकर मुंबई उच्च न्यायालयात वकील असून हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

Aprna

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

News Desk