मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (१२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची डगमगलेली आर्थिक व्यवस्था लक्षात घेता आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याकरता २० लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तृळातून टीका देखील यायला लागल्या तर काहींनी या पॅकेजचे स्वागतही केले आहे.
“पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे. घरी परतणाऱ्या मजूर, कामगार, गरीब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचे आहे. तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती. पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांबाबतीत आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोत”,अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.
1/2
मा. मोदी जी,आपने सम्बोधन से मीडिया को ख़बर बनाने को “हेडलाइन” तो दे दी पर देश को “मदद की हेल्पलाइन” का इंतज़ार है।
वादे से हक़ीक़त तक का सफ़र पूरा होने का इंतज़ार रहेगा।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2020
तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींना सवाल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिले आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचे नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवालही त्यांनी केला आहे. तर या पॅकेजमूळे असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आली आहे. मध्यम वर्गाची बाजू घेण्याची आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. परंतु याची पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही करण्यात येत आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
It seems that @PMOIndia doesn't want to deliver the bad news or harsh details himself. It's left for @nsitharaman or the CM's to deal with. It maybe his PR routine.
But if the PM doesn't want to say anything concrete, why come live and confuse the entire nation? #Lockdown4— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 12, 2020
तर, माजी केंद्रिय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनीही मोदींनी केवळ हेडलाईन दिली अशी टीका केली आहे. “काल पंतप्रधानांनी हेडलाइन आणि कोरं पान दिलं. अर्थमंत्री ते कोरं पान कसं भरतात ते आज आम्ही पाहू. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातल्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असेल. कोणाला काय मिळणार त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने अभ्यास करु” असे चिदंबरम यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
Yesterday, PM gave us a headline and a blank page. Naturally, my reaction was a blank!
Today, we look forward to the FM filling the blank page. We will carefully count every ADDITIONAL rupee that the government will actually infuse into the economy.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 13, 2020
तर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देणारे पी.एम केअर फंडासाठी इतकी जाहीरात का करतात असा खोचक सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे.
20 लाख कोटी रुपयांचं "पॅकेज" देणारे P. M care fund साठी एव्हढी जाहिरात का करतायत ?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 13, 2020
तर, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो की, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा. pic.twitter.com/LgHxWELeaL
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 12, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.