HW News Marathi
देश / विदेश

“लोकांच्या मनातील पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणं हे मोठं आव्हान”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(३१ जुलै) आयपीएस प्रशिक्षणार्थींनी संवाद साधला आहे. या दरम्यान त्यांनी लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे. सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला आहे.

आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी

प्रशिक्षणार्थींशी चर्चा करतं नरेंद्र मोदींनी अनेक महत्वाचे सल्ले दिले आहेत. सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, , “आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात. ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते.”

“सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे. कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तथापि, धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. ” असं म्हणत, पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले आहे.

राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम

प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे कायम लक्षात ठेवायला सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं. कामगिरीवर असताना राष्ट्रहीत कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk

गुगलचा जाहीर माफीनामा

News Desk

अमित शहा यांचे पद येणार धोक्यात

News Desk