HW News Marathi
देश / विदेश

…आणि जेव्हा पंतप्रधान मोदी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करतात

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासाठी काल (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं समोर आलं आहे.दिल्ली भेटी दरम्यान चौकशी कालचा दिवस राजकीयदृष्ट्या मोठ्या घडामोडीचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले.

या भेटीत मराठा आरक्षणापासून ते मुंबई मेट्रोपर्यंतच्या विविधी विषयांवर पंतप्रधानांना निवेदन दिलं गेलं. जवळपास पाऊन तासापेक्षा जास्त वेळ ही महत्वाची बैठक चालली. याच बैठकी दरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे औपचारीक बैठक सुरु होण्यापुर्वी मोदींनी अजित पवारांकडे ही चौकशी केली आहे.

अजित पवारांकडे मोदींनी केली पवारांची विचारपूस

अजित पवारांनीही पवारांच्या तब्येतीबाबत मोदींना माहिती दिल्याचं समजतं. यावर राष्ट्रवादीकडून ठोस अशी माहिती सांगण्यात आलेली नाही. पण दिल्ली वर्तुळात यावर चर्चा आहे. आणि तरीही शरद पवार सक्रिय दोन महिन्यांपुर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईत दोन शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले होते. पवारांच्या ह्याच दोन शस्त्रक्रियांबाबत मोदींनी चौकशी केल्याची चर्चा आहे.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही पवारांनी आवश्यक तेवढाच आराम करत कामाला लागले. हॉस्पिटलमधूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी कामाची चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी व्हायरलही झाली होती. पवार आणि मोदी हे दोन्हीही राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळेच एकमेकांच्या कामाबद्दल ते टिकाटिप्पणी करत असले तरीसुद्धा ते एकमेकांची आस्थेनं विचारपूस करण्याचं विसरत नाहीत हेच खरं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे नाव घेण्याचा अधिकार ! 

News Desk

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, जीवितहानी नाही

Gauri Tilekar

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna