HW News Marathi
देश / विदेश

२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा, पंतप्रधानांचे आदेश

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण प्राण सोडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बैठक घेत काही सूचना दिल्या.

देशभरातील ऑक्सिजन तुटवड्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्रालयासह अन्य विभागांची आपत्कालीन बैठक घेत २४ तास ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतूक करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व मंत्र्यांनी राज्यांशी समन्वय ठेवून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

‘ट्रान्सपोर्ट कंपन्यांना ऑक्सिजनची वाहतूक करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. चालकांची शिफ्टमध्ये ड्युटी लावून २४ तास तयार राहण्याचे निर्देश द्यावेत. तसेच सिलिंडर भरणाऱ्या प्लांटनीही २४ तास काम करण्यास परवानगी आहे. देशभरातील सर्व हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा पुरवठा झाला पाहिजे यासाठी व्यापक सर्व्हे करावा.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रात भाजपला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दलचा NDAतून काढता पाय

News Desk

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

News Desk

फेसबुक डेटा लिक प्रकरणी केंब्रिज एनालिटिका कंपनी बंद

swarit