मुंबई | अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईपासून तौक्ते चक्रीवादळ १२० किमी अंतरावर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीला याचा मोठा फटाका बसत आहे..आता चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असलं तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतही गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला.
Prime Minister Narendra Modi spoke to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on the #CycloneTauktae related situation. (file pictures) pic.twitter.com/GpkVHs3rMT
— ANI (@ANI) May 17, 2021
रौद्रवतार धारण केलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली आहे.
पुढील काही तासात मुंबईसह परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत आगामी काही तासांत ताशी १२० वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.