HW News Marathi
Covid-19

देशातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी टाटा ग्रुपचा पुढाकार, पंतप्रधानांनी केलं कौतुक

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, या कामात आता टाटा उद्योग समूहानंही मदतीचा हात पुढं केला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा समूहानं केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टाटा समूहाचं कौतुक केलं असून, या उद्योगसमुहाचा हा दयाळूपणा अतिशय प्रशंसनीय असल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरत असून रुग्ण आढळण्याचे प्रमाण अनेक पट अधिक आहे. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहानं जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली असून, त्यांनी द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.

‘द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करण्यात येत असून, देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यास आम्ही मदत करत आहोत. कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असं टाटा समूहानं म्हटलं आहे. तत्पूर्वी टाटा स्टीलच्या वतीनं दररोज ३०० टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही करण्यात आली होती.

टाटा समूहाच्या या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं. ‘टाटा समूहाचा हा दयाळूपणा आहे. आपण सगळे भारतीय नागरिक ) कोरोणनाशी एकत्रितपणे लढा देऊ’ असं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, टाटा समूहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचेही कौतुक केलं होतं. टाटा उद्योग समूहानं याआधीही कोरोना संकटाशी लढण्याकरता ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र शोकमग्न आहे! । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

Corona World Update : जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाखांच्या वर, २ लाख ८३ हजार मृत्यू

News Desk

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन

News Desk