HW News Marathi
देश / विदेश

‘कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत’, मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

नवी दिल्ली | राजकारणात विरोधी पक्ष नेहमीच एकमेकां विरोधात टीका करत असतात. अशीच टीका आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. देशातील करोना स्थितीसंबंधी विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असून त्याला उत्तर द्या असा आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांना दिला आहे. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांना वारंवार सत्य सांगा असा आग्रह यावेळी मोदींनी केला आहे.

मोदींकडून काँग्रीसवर टीका

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी पक्षातील खासदारांना निर्देश देताना काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं तरी आमचीच चिंता असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. नकारात्मक वातावरण निर्माण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी यावेळी केला आहे.

काँग्रेसवर टीक करताना ते म्हणाले की, “आपण इथपर्यंत आलो आहोत आणि या कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत. काँग्रेसचे वागणं दुर्दैवी आहे. आपण इतक्या दूरपर्यंत आलेलो आहोत आणि लसींचा तुटवडादेखील नाही हे त्यांना पचलेलं नाही. दिल्लीतही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे”.

काँग्रेसला आपल्या मतदारांची चिंता नाही

भाजप सध्या आक्रमक होऊन काँग्रेसवर टीका करत आहे. “काँग्रेसला आपल्या मतदारांची चिंता नाही. आपण ६० वर्ष देशावर राज्य केलं हे अद्यापही त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळेच जनतेने आपली निवड केल्याचं त्यांना पचत नाही आहे. पश्चिम बंगाल, आसाममध्ये पराभव झाल्यानंतरही विरोधक म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत नाही आहेत. त्यांनी जनहिताचे मुद्दे आक्रमकपणे मांडणे अपेक्षित असताना तसं होताना दिसत नाही,” असंही यावेळी मोदी म्हणाले आहेत.

काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्ष देशातील करोना स्थितीवरुन वारंवार मोदी सरकारवर टीका करत असून अपयशी ठरल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कऱण्यासाठी खासदारांना तायर राहण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ही तिसरी लाट येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवे मंत्री आज आपल्या पदाचा कारभार हाती घेणार; पंतप्रधानांनी बोलावली बैठक

Jui Jadhav

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

News Desk