ठाणे | राज्यात कोरोनाची परिस्थिती खावालली असून ऑक्सिजन, बेड, औषधे या सगळ्याचाच आता तुटवडा भासण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, अशातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यतत्परतेचे एक उदाहरण समोर आले आहे.ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी व्हॉट्सॲपवरुन उद्धव ठाकरेंना ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच २४ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राज्यभरात कोव्हिड रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असतानाच ठाण्यातही हीच परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली होती आणि काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी ती मदत पुर्ण केली आहे.
नरेश म्हस्केंनी व्हॉट्सअॅपवर केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तासाभरात दहा मेट्रिक टन ऑक्सिजन ठाणे शहराकडे रवाना केला. यासोबतच पुढील काही तासांत उर्वरित १४ मेट्रिक टन ऑक्सिजनही ठाणे शहरात पाठवला जाणार आहे. त्यामुळे हळूहळू राज्यात सगळं काही सुरळीत होण्याच्या प्रतिक्षेत सध्या सगळे जण आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल (११ एप्रिल) संध्याकाळी राज्याच्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, लॉकडाऊन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच, आज पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत काय निर्णय लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नेतां संवेदनशील असेल तर १ मेसेज ही पुरतो ,जनतेची गरज समजून घ्यायला
…
आम्हाला तुमचा अभिमान आहे @OfficeofUT pic.twitter.com/fXdgwzwGTk— Naresh Mhaske (@nareshmhaske) April 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.