HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये सैन्य भरती ६३ जागांसाठी २० हजारहून अधिक तरुण

नाशिक | भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून जवळपास २० हजार तरुण दाखल झाले आहे. या भरतीसाठी आलेल्या तरुणांची राहण्याची आणि झोपण्याची सोय देखील केली नसल्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला, बस थांबव्यावर मिळेत्या ठिकाणी रात्र काढावी लागत आहे. ११६ इन्फट्री पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी तब्बल २० हजारहून अधिक तरुण देवळाली कम्पमध्ये आले आहेत.

सैन्या होणाऱ्या भरती आजपासून (३० ऑक्टोबर) सुरू होणार आहे. ही भरती नाशिक येथील आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात होणार आहे. भरतीच्या वेळी कोणताही गोंधळ होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ३ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, भरतीसाठी होणारा गोंधळ नवा नसून दरवेळी भरतीच्या वेळी अशीच स्थिती पाहायला मिळते. काही वेळा तर गर्दी नियंत्रणात न आल्याने भरतीसाठी आलेल्या युवकांवर लाठीमारदेखील केला जातो.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री घेणार बैलगाडा मालकांवरील गुन्हे घेणार मागे…

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk

कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समिती बैठक व शेतकऱ्यांशी चर्चा

Aprna