HW News Marathi
Covid-19

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिक ऑक्सिजन दुर्घटना घडली, चौकशी समितीचा अहवाल सादर

मुंबई । राज्यातील कोरोनस्थिती चिंताजनक असताना दुसरीकडे नाशिकमध्ये एक दुर्घटना घडली. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २४ कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, राज्य सरकारकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता मुदतीपूर्वीच या ७ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून ही दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे ह्यात नमूद करण्यात आले आहे.

नाशिकमधील दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली या चौकशी समितीला १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता मुदतीपूर्वीच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे, नमूद करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या उच्चस्तरीय समिती चौकशी समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ७५.८६%

News Desk

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

News Desk

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी कल्याणमध्ये १ जण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

News Desk