HW News Marathi
Covid-19

नाशिक शहरमध्ये ‘या’ पोलीस आयुक्तांनी दिले वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश

नाशिक | देशातील रेड झोनमध्ये सुद्धा मध्यविक्रीला परवानगी दिली आहे. यानुसार नाशिकमधील सर्व मद्यप्रेमींनी दुकाना बाहेर आज (४ मे) रांगा लावल्या होत्या. मात्र, नाशिकमध्ये नाशिक शहरात वाईन शॉप बंदचे आदेश, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. नाशकात दारुच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींची गर्दी वाढल्याचे पाहिल्यानंतर शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश नांगरे पाटलांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही मद्यविक्रीला आजपासून सशर्त परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातील वाईन शॉप्सवर मद्यप्रेमींची सकाळपासून गर्दी दिसून आली होती. नाशिकरोड येथील दत्त मंदिर आणि जीपीओ जवळील एका मद्य दुकानात रांगा लागल्या असून डिस्टसिंगचा ऐशीतैशी झालेली दिसून आली. नाशिक शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करत वाईन शॉप सुरु होते. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील वाईन शॉप्स बंद राहतील, असे आदेश नांगरे पाटलांनी काढला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या आकडेवारीचे व्यवस्थापन करण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोनातून उपाययोजनांवर भर द्यावा – फडणवीस

News Desk

…म्हणून अजिंक्य राहाणेंनी केले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक

News Desk

देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत । सामना

News Desk