HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील दोन बालकांना यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

Aaksh Khillare & Zen Sadavarte

नवी दिल्ली | दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शोर्य पुरस्काराचा मान यंदाच्या वेळी महाराष्ट्राच्या दोन बालकांना मिळणार आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोन बालकांना हा पुरस्कार आज (२२ जानेवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला आहे. आकाश शाळेत जात असताना त्याला मायलेकी बुडताना दिसल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने सत्तर फुट खोल नदीत उडी मारुन या मायलेकींचा जीव वाचवला होता. आणि त्याच्या या शौर्याचेच कौतुक या पुरस्कारातून करण्यात येणार आहे.

मुंबईतील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागली होती. या आगीतून झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले होते. आग लागली तेव्हा झेन सदावर्तेने यांनी प्रसंगावधान राखत सर्वांच्या तोंडावर सुती कापड बांधले होते. आगी दरम्यान धुराचे लोट निर्माण होतात. त्यातून वाचण्यासाठी ओला कापड तोंडावर बांधल्यास धूर नाकात जात नाही याचे गांभीर्य लक्षात घेत तिने या सगळ्यांचे प्राण वाचवले होते. देशातून अशा शौर्यगाथांसाठी एकूण २२ जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात १० मुली आणि १२ मुले या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Related posts

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

News Desk

सलमानला तुरुंगावास झाला तर जोधपूर तुरुंगात आसाराम बापू शेजारी

News Desk

#MaharashtraElections2019 : महायुती आणि महाआघाडीला बंडखोरांचे मोठे आव्हान

News Desk