HW News Marathi
महाराष्ट्र

चिखलदऱ्यातील रस्त्यांची पाहणी करताना नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेतले

अमरावती | अमरावतीतील चिखलदरा येथे आढावा बैठकीत सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी खारदाक नवनीत राणा यांनी केली. या पाहणीदरम्यान, चिखलदरामध्ये सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून यासाठी अवैध स्टोन क्रशर वापरण्यात येत असल्याचे, तसेच अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरु असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आले.

खडीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या कामात जास्त तफावत असल्याचे खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. सिडकोच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याने नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. विदर्भातील काश्मीर अशी ‘चिखलदरा’ या पर्यटन क्षेत्राची ओळख आहे.

चिखलदरा प्रवेशासाठी एक विशेष रस्ता बनवण्यात येत असून या ५ किमीच्या रस्त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. चिखलदरा हे व्याघ्र संरक्षण प्रकल्प, तसेच पर्यटन स्थळ आहे. मात्र, असे असताना देखील या ठिकाणी स्टोन क्रशर आणि रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरासरी राज्य सरकारने वीज ग्राहकांसोबत बनवाबनवी केली – आशिष शेलार

News Desk

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली! – उपमुख्यमंत्री

Aprna

डुकरांसोबत कुस्ती करू नये, हायड्रोजन बॉम्बवर फडणवीसांचे सूचक ट्वीट

News Desk