HW News Marathi
महाराष्ट्र

नवरात्रीत मिळणार राज्याच्या राजकारणाला कलाटणी

मुंबई- पितृपक्ष संपल्यानंतर गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. याच शुभ मुर्हूतावर राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या काही महत्वाच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

पहिली घटना म्हणजे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्ष सोडण्याची शक्यता आहे. परंतु पक्ष सोडून ते कोणत्या पक्षात जातील, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु राणेंच्या गेल्या काही दिवसातील भेटीगाठीवरून ते भाजपचा पर्याय स्वीकारतील असा, अंदाज आहे. भाजपवाले राणेंना प्रवेश देण्यात इच्छुक आहेत. परंतु त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढण्याऐवजी वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे. दुसरे असे राणे भाजपात आल्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसरकार अल्पमतात येऊ शकते. दुसरीकडे राणेंमुळे तीन आमदार भाजपात येतील परंतु त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण पक्षातंर्गत बंदी कायद्यामुळे त्यांचे पदे धोक्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितेश राणे कॉँग्रेस सोडणार नाही. त्यांचे समर्थक आमदार देखील त्यामुळे कॉँग्रेसमध्ये राहण्याची शक्यता आहे. राणे एकटे पडण्याची अधिक शक्यता आहे, त्यामुळे त्यांन पक्षात घेऊन काहीच हासिल होणार नसल्याचे भाजपच्या गोटातून कळते. दुसरे असे की, राणे यांचे विचार संघाच्या विचाराशी पूर्णतः विसंगत आहेत. त्यामुळे संघाकडून त्यांच्या नावाला होकार मिळणे कठीण वाटते, असे असले तरी शिवसेनेला वेळोवेळी त्यांची जागा दाखवून राणे नावाचे अस्र वापरण्याची धूर्त खेळी भाजप खेळत आहे.

शिवसेनेच्या गोटात सध्या अस्वस्तता आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची वेळ आल्याचे काहीजण सांगत आहेत, परंतु अंतर्गत गटबाजीने पक्षप्रमुख घायाळ आहेत. त्यामुळे पक्षातून कितीही आग्रह झाला तरी त्यांना सत्तेतून बाहेर पडणे कठीण जात आहे. भाजपवाले सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरू शकतात, याची त्यांना दाट भीती आहे.

राणे काय करणार आहेत, हे त्यांच्या जवळच्याही लोकांनाही माहीत नाही. तीन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतंत्र समर्थ विकास पॅनलची घोषणा करून ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असताना आता ते नवे काय सांगणार असल्याने राणे समर्थक गोंधळलेले आहेत. पॅनल काढले असले तरी राणे नवा पक्ष काढण्याची अजिबात शक्यता नाही. भाजपमध्ये जाण्याचे त्यांनी निश्चित केले असून आता आपल्याला काय मिळते, याकडे त्यांचे लक्ष असल्याने ते गुरुवारी पत्रकार परिषदेत नवीन काहीही न सांगता आपल्या नेहमीच्या आवडत्या उद्योगांप्रमाणे काँग्रेस तसेच शिवसेनेवर टीका करण्याचे काम करतील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, दुसरी घटना म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून बाहेर पडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवारी आपल्या नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नव्या संघटनेची सर्व तयारी झाली असून कोल्हापूरला राज्यभरातील २ हजार प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाती ते नवा झेंडा देतील. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज मार्केट यार्डच्या सभागृहात मसुदा समितीची बैठक होऊन नंतर संघटनेच्या नावाची घोषणा करून मसुदा, झेंड्याचे अनावरण करण्यात येईल.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात तिसरी घटना म्हणजे याच नऊ दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा पाया रचला जाणार आहे. कोणाला डच्चु द्यायचा किंवा कोणाला पक्षात घ्यायचे, याची रुपरेषा या कालावधीत ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परेदश दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्या आहे. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

नवरात्रीचा शुभ मूर्हर्त शोधून राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी फेसबूकवर हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. दुसरीकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी मात्र अद्याप थंड बस्त्यात आहे. त्यांना कोणाशी काही देणे-घेणे नसल्याचे सध्या तरी दिसते. राज्यातील घडामोडीकडे ते तटस्थपणे पाहत आहेत.एकूणच हा आठवडा राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

News Desk

शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका

Adil