मुंबई | राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा विधान परिषदंचं विरोधीपक्ष नेतं देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली ?, मलिकांनी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन खरेदी केली?, असे सवाल फडणवीसांनी मलिकांना विचारले आहेत. तसेच मुंबईत आरडीएक्स पेरलेल्यांशी मलिकांचे संबंध आहेत?, असे गंभीर आरोप फडणवीसांनी मलिकांनावर केलं आहेत.
बॉम्ब ब्लास्ट आरोपींकडून मलिकांनी कोट्यांवधीच्या जमिनी ३० लाखांत खरेदी केल्या आहेत. या सर्व जमिनी मलिकांनी कवडी मोलात विकत घेतल्याचेही फडणवीसांनी सांगितलं. केवर १ नाही तर मलिकांचा ४ संपत्ती ही अंडरवर्ल्वशी संबंधित असल्याचे फडणवीस म्हणालं. मलिकांच्या विरोधातील सर्व पुरावे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचे देखील फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.
“सरदार शहाबली खानला १९९३ बॉम्बब्लास्टचे गुन्हेगार असून यांना जन्मठेप झाली आहे. शहाबली खान हा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्चेंज या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होतं.”
जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला
मुबंईतील कुर्ल्यात एलबीएस रोडवर जमीन खरेदी केली. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. तसेच सॉलिडसला ही जागा केवळ ३० लाखात विकली गेली. यात मलिक या कंपनीत २०१९पर्यंत होतं. मलिक हे मंत्री झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला होता. ही जमीन त्यांनी खरेदी केली. तेव्हा जमिनीची किंमत रेट २ हजार स्क्वेअर फुटनं केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं २० लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे १५ लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.