HW News Marathi
Uncategorized

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ जामिनानंतर मलिकांची प्रतिक्रीया

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यन खानसह तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आलं, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल.

उद्या किंवा शनिवारी हे तिघे कारागृहाबाहेर येतील

ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले. क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर 25 दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यानंतर उद्या किंवा शनिवारी हे तिघे कारागृहाबाहेर येतील. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय.

तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय. दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही !

News Desk

कच्च्या तेलाचे उत्पादन कमी होणार, इंधनाचे दर भडकणार

News Desk

बस अपघातात 30 ठार

News Desk