HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याला रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार पण…

मुंबई | केंद्राने रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रसरकारच्यावतीने राज्यांना वाटप करण्यात येणारा रेमडेसिवीरचा डाटा जाहीर करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीने राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता देण्यात येणारा साठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

त्यावर केंद्राने शनिवारी २६ हजार दरदिवशी देणार होते त्यात ४० हजार अशी वाढ जाहीर केली आहे. यातून जो तुटवडा निर्माण झाला आहे तो काही प्रमाणात कमी होईल. मात्र दरदिवशी ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा अशी मागणी आहे. त्यामुळे ४० हजार दिले आहे.

तर त्यामध्ये १० हजाराची वाढ केल्यास राज्याची अडचण दूर होणार आहे. रेमडेसिवीरचा दहा हजाराचा साठा लवकरात लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्वतः केंद्राकडे मागणी करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या ‘भुंकऱ्या’ अँकरला सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे – सामना 

News Desk

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit

‘अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेलच’- संजय राऊत

News Desk