मुंबई | मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
राज्यसरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाही. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहे मात्र राज्यसरकारने परवानगी दिली नाही सांगत आहेत परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही असा सवाल करतानाच केंद्रसरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. रेल्वेने नियमित सेवा सुरू करा… जादा गाड्या सुरू करा… गर्दी होवू नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.