HW News Marathi
महाराष्ट्र

“रश्मी शुक्लांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचे कटकारस्थान”, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप   

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिलेला अहवाल नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला आणि त्यावर सिताराम कुंटे यांनी सही केली, असा आरोप केला. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “रश्मी शुक्लांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, ते स्वतः रश्मी शुक्लाच्या पत्राचा आधार घेऊन दिल्लीत प्रेस घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही प्रेस घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे आरोप करत होते. केंद्रीय गृहसचिवांना व राज्यपालांनाही ते भेटले.

”‘रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान’

देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो ६ जीबीचा डेटा दाखवावा, असं आव्हानच मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला आहे.

‘फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं’“मुंबईत प्रेस घेऊन फडणवीसांनी सांगितलेला रश्मी शुक्लाचा रिपोर्ट काय आहे? बेकायदेशीर फोन टॅप केले. रश्मी शुक्लाचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या असं ते सांगत आहेत. त्यात 12 नावं आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बदल्या होत राहतात. पोलीस बोर्डाच्या अध्यक्षतेखाली या बदल्या होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलंय,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानीचे स्पिकर !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

News Desk

हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप!

News Desk